ऊसतोड कामगारांच्या मेळाव्याला केवळ नेत्यांचीच गर्दी होऊ नये; पंकजांचा आंबेडकरांना टोला

pankaja munde & Prakash Ambedkar

बीड : दसऱ्याच्या दिवशी भगवान गडाच्या पायथ्याशी ऊसतोड कामगारांचा मेळावा घेण्याचं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलं आहे. त्यावर भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी सडकून टीका केली आहे. मेळावा जरूर घ्या. पण या मेळाव्याला ऊसतोड कामगरांपेक्षा नेत्यांनीच जास्त गर्दी नये, असा टोला पंकजा मुंडे यांनी प्रकाश आंबेडकरांना (Prakash Ambedkar) लगावला आहे.

तब्बल आठ महिन्यानंतर पंकजा मुंडे आज आपल्या पारंपरिक मतदारसंघात बीडला आल्या. यावेळी त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी आंबेडकरांना हा टोला लगावला. मला प्रकाश आंबेडकरांबद्दल मोठा आदर आहे. त्यांनी भगवान गडाच्या पायथ्याशी ऊसतोड कामगारांचा मेळावा आयोजित केला आहे. त्याचं स्वागतच आहे. मात्र, या मेळाव्याला कामगारांपेक्षा नेत्यांनी जास्त गर्दी करू नये, असा टोला पंकजा मुंडे यांनी लगावला.

दसऱ्याच्या दिवशी ऊसतोड कामगारांचा मेळावा भगवान गडाच्या पायथ्याशी घेणार असल्याचं वंचितनं जाहीर केलं आहे. ऊसतोड कामगारांचा मेळावा आयोजित करून एक प्रकारे आंबेडकरांनी पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यासमोर नवं आव्हानच उभं केल्याचं बोललं जातं. ऊसतोड कामगार ही पंकजा आणि धनंजय मुंडे यांची खरी व्होटबँक आहे. आता त्यालाच आंबेडकर यांनी सुरुंग लावायला निघाले असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे आंबेडकर बीडमध्ये त्याचीच पुनरावृत्ती करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER