बीडच्या पालकमंत्र्यांकडून छत्रपतींच्या संस्कारांची पायमल्ली : पंकजा मुंडे

Dhananjay Munde - Pankaja Munde

मुंबई :- परळीतील व्यापारी मारहाण प्रकरणी कोणाचीही गय केली जाणार नाही,” असा इशाराच राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणी दिला. पण, यावरून भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी धनजंय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. बीडच्या पालकमंत्र्यांकडून छत्रपतींच्या संस्कारांची पायमल्ली केल्याची टीका पंकजा यांनी ट्विटरून केली आहे.

‘छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा’; सचिन तेंडुलकरचं खास ट्विट

परळीत गुंडागर्दी, हफ्तेखोरी ,माफियाराज करायचं आणि पोलिसांनी कर्तव्य बजावल्यावर ,गुन्हे दाखल झाल्यावर मग ‘गय करणार नाही ‘अशी भाषा करायची हे दुटप्पी धोरण ..गुंडांचं आत्मबल वाढवणारं पालकत्व आमच्या बीडला मिळालं हे दुर्दैव..हे खपवून घेतलं जाणार नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या .

दरम्यान शहरातील टॉवर चौक परिसरामध्ये मुंडे समर्थ असणाऱ्या राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी एका व्यापाऱ्याला मारहाण केली. मुंडे समर्थकांनी या चौकामधील गाड्यांची केलेली तोडफोड केली तसेच सार्वजनिक मालमत्तेची नासधूसही केली. हा सर्वप्रकार या परिसरामध्ये बसवलेल्या वेगवगेळ्या सीटीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.