पंकजाताई होणाऱ्या त्रासाची मला जाणीव, मोठा भाऊ म्हणून मी सोबत ; धनंजय मुंडेंचे ट्विट

Dhananjay Munde - Pankaja Munde

मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे .भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde)यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर घरीच उपचार सुरु आहेत. यानंतर समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. प्रभू वैद्यनाथाच्या आशीर्वादाने आपण लवकरच बऱ्या व्हाल, काळजी घ्या ताई, असे ट्विट धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांनी केले आहे .

ताई , या विषाणूचा सामना मी दोनवेळा केलाय, यामुळे होणाऱ्या त्रासाची मला जाणीव आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने योग्य उपचार घ्या. घरच्या सर्वांची टेस्ट करून घ्या, मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच. प्रभू वैद्यनाथाच्या आशीर्वादाने आपण लवकरच बऱ्या व्हाल, काळजी घ्या ताई, अशी पोस्ट धनंजय मुंडेंनी टाकली आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांच्या भगिनी आणि बीडच्या भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनाही कोरोनासदृश लक्षण दिसत होती. त्यामुळे त्या घरीच विलगीकरणात उपचार घेत होत्या. त्यानंतर आता पंकजा मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button