‘मुंडे साहेबांची लढाई जिंकण्यासाठी यापासून दूरच’, मुख्यमंत्रीपदाबाबत पंकजाचे मोठे विधान

औरंगाबाद : भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja munde) यांनी परत एकदा ओबीसीची स्वतंत्र जनगणनाकरण्याची मागणी उचलून धरली आहे. काही दिवसांनी जनगणना होणार आहे. या जनगणनेत ओबीसींसह जातीय जनगणना व्हावी. म्हणजे सगळ्यांची ताकद किती आहे हे स्पष्ट होईल. तसंच त्यांचे प्रश्न उघड होतील, सरकारलाही त्यावर तोडगा काढणे सोपं जाईल असं विधान त्यांनी केले आहे. रविवारी जालन्यात झालेल्या ओबीसी मेळाव्यात यापुढचा मुख्यमंत्री ओबीसी (Chief Minister OBC) असावा अशा घोषणा देण्यात आल्या. यावर पंकजा मुंडे यांनी भाष्य केलं आहे.

तुम्ही मुख्यमंत्री होणार का? असा प्रश्न पंकजांना विचारण्यात आला असता त्यांनी आपली पुढची वाटचाल स्पष्ट करत मोठे विधान केले. “मला यापासून थोडं लांबच ठेवा. कोणत्याही पदावर नसताना मला ही चळवळ लढायची आहे. माझ्यासाठी हे महत्वाचं ध्येय आहे. मुंडे साहेबांची एक अपूर्ण लढाई मी लढणार आहे”, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर विराम दिला.

ओबीसीची जनगणना झाली पाहिजे ही भूमिका गोपीनाथ मुंडे यांनी वेळोवळी मांडली. प्रीतम मुंडे यांनीदेखील संसदेत याबाबत नेहमीच आवाज उठवला आहे. आता काही दिवसांनी जनगणना होणार आहे, जनगणना होत असताना ती पाऊलं सकारात्मक पडली पाहिजेत. जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. याच्यात प्रत्येत प्रश्न उघड होतील. त्या समुदायाला न्याय देण्यासाठी सरकारला मदत होईल, असं पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं.

आता मी राष्ट्रीय स्तरावर काम करत असल्यानने माझ्या अनेक भूमिका, मुद्दे राष्ट्रीय स्तरावर नोंदवण्याची आवश्यकता असते. त्याच्यामुळे मी हिंदी भाषा वापरते, काल पहिल्यांदा वापरली नाही. जेव्हापासून मी राष्ट्रीय सचिव झाले तेव्हापासून बऱ्याच शुभेच्छा आणि मतं हिंदीत व्यक्त करत असते, असं स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी केलेल्या हिंदी ट्विटबाबत दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER