हा प्रसादच गोड मानून घ्या बाबांनो, हार, सत्कार, सेल्फी काही नको; पंकजा मुंडेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

Pankaja Munde

मुंबई : कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या जयंतीनिमित्त कार्यकर्त्यांना गर्दी न करण्याचे आणि कोरोनाच्या नियमांचं पालन करण्याचे आवाहन केले आहे .

आज (11 डिसेंबर) त्यांनी जयंतीच्या प्रसादाच्या पॅकिंगच्या कामाची स्वतः पाहणी केली. या भेटीचे फोटो ट्विट करताना त्या म्हणाले, “कोरोनामुळे दरवर्षीप्रमाणे भोजनाच्या पंक्ती वैगेरे करता आल्या नाहीत. यंदा हा प्रसादच गोड मानून घ्या बाबांनो. हार, सत्कार, सेल्फी काही नाही, शुद्ध भावना आणि तुमची ऊर्जा हीच बस आहे , असे पंकजा मुंडे म्हणाल्या .

पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त कार्यकर्त्यांना व्हिडीओ मेसेजद्वारे आवाहन करत रक्तदान शिबिरं आयोजित करण्याचंही आवाहन केलं. त्या म्हणाल्या, “12 डिसेंबर हा आपल्या सर्वांना उर्जा देणारा दिवस आहे. गोपीनाथ मुंडे संघर्षाचं मुर्तीमंत मोठं उदाहरण होतं. आज ते आपल्यात नाही तरीही ते आपल्यासाठी संघर्षाचा महामेरु आहेत. लोकांना स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा देणारं ते नेतृत्व आहे. गोपीनाथ गडाच्या निर्मितीनंतर 12 डिसेंबर आणि 3 जून हे दिवस आपण वेगवेगळ्या पद्धतीने साजरे करतो. या दिवशीच्या कार्यक्रमांना मुख्यमंत्र्यांपासून मोठमोठे नेते आणि सामाजिक क्षेत्रातील नेते उपस्थित राहिले. छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे असे दोन्ही छत्रपती गोपीनाथ गडावर आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER