‘शकीला’मध्ये पंकज त्रिपाठी साकारणार साऊथ इंडियन सुपरस्टारची भूमिका

Shakeela - Pankaj Tripathi

साऊथची सेक्सी अभिनेत्री शकीलाच्या (Shakeela) जीवनावर शकीला नावानेच सिनेमा बनत असल्याचे आम्ही तुम्हाला सांगितले होेतेच. रिचा चड्ढा यात शकीलाची भूमिका साकारीत असून आता या सिनेमात पंकज त्रिपाठीही साउथ इंडियन सुपरस्टारची भूमिका साकारताना दिसणार आहे. सोमवारी सोशल मीडियावर पंकज त्रिपाठीचे (Pankaj Tripathi) पोस्टर रिलीज करण्यात आले. यात पंकज अत्यंत वेगळ्या रुपात दिसत आहे.

पंकज त्रिपाठीने ‘मिर्झापुर’मध्ये कमालीचे काम केले होते. या वेबसीरीजमध्ये त्याने केलेले काम प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते. त्याच्या या कामामुळेच त्याला अनेक निर्मात्यांनी त्यांच्या चित्रपटात काम दिले होते. मिर्झापुर 2 (Mirzapur 2) मध्येही पंकजने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आकर्षित केले होते. विविध भूमिका साकारणारा पंकज आता शकीलामध्ये दिसणार आहे.

पंकजने शकीलामधील भूमिकेबाबत बोलताना सांगितले, आजवर विविध चित्रपटात मी विविध भूमिका साकारल्या आहेत पण सुपरस्टारची भूमिका कधीही साकारली नव्हती. मात्र आता ख्रिसमसच्या सुट्टीत प्रदर्शित होणाऱ्या ‘शकीला’ या चित्रपटात मी प्रथमच एका सुपरस्टारची भूमिका साकारीत आहे. तसेच एक अत्यंत उत्कृष्ट अभिनेत्री असलेल्या रिचा चड्ढाबरोबर काम करण्याचाही आनंद मला होत आहे. पडद्यावर फिल्म स्टारची भूमिका साकारताना एका अभिनेत्याला जे काही आवश्यक आहे ते दाखवण्याची माझी इच्छा होती. ती इच्छा या चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण होत आहे. हा सुपरस्टार खूपच रंगेल असून खूपच मजेदार अशी माझी भूमिका आहे असेही पंकजने सांगितले.

2018 मध्ये या चित्रपटाला सुरुवात झाली होती आणि रिचा चड्ढाने (Richa Chadha) या भूमिकेसाठी खूप रिसर्च केला होता. शकीलाच्या भूमिकेबाबत बोलताना सांगितले, चित्रपटसृष्टी पूर्णपणे पुरुषप्रधान आहे. अशा इंडस्ट्रीत एका अभिनेत्रीला स्वबळावर स्वतःची जागा निर्माण करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. बदनामी आणि बेइज्जतीचाही सामना करावा लागतो. अशा स्थितीत अनेक अडचणींचा सामना करून अभिनेत्री स्वतःचे स्थान निर्माण करते. जेव्हा ती स्वतःचे स्थान निर्माण करते तेव्हा प्रेक्षक तिला पसंत करू लागतात. जे लोक तिची बदनामी करीत असतात तेच तिच्याकडे आदराने पाहू लागतात. ही भूमिका मला साकारायला मिळाली हे माझे भाग्य आहे असेही रिचा म्हणाली होती.

ख्रिसमस सुट्टीच्या काळात शकीला हिंदीसोबतच तामिळ, तेलुगु, कन्नड़ आणि मल्याळममध्येही प्रदर्शित केला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER