दहावीत मुलीची भूमिका साकारली होती पंकज त्रिपाठीने

Pankaj Tripathi played the role of the tenth girl

पंकज त्रिपाठीने (Pankaj Tripathi ) अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे. त्याला ‘मिर्जापुर’ (Mirzapur) या वेबसीरीजमधील कालीन भैया चांगलाच लोकप्रिय झालेला आहे. चित्रपटांमध्येही त्याच्या भूमिका कमालीच्या चांगल्या होत आहेत. सध्या आपल्या अभिनयाने सगळ्यांचे लक्ष वेधत असलेला पंकड त्रिपाठी शाळेत असताना मात्र चक्क मुलींच्या भूमिका साकारीत असे. त्याने स्वतःच ही माहिती देत मी आयटम डांस करीत असे असेही सांगितले.

पंकज त्रिपाठी दहावीला असताना एका नाटकात काम करीत होता. त्या नाटकात मुलीची भूमिका करणारा मुलगा ऐनवेळी न आल्याने पंकजला मुलीची भूमिका करण्यास सांगण्यात आले. पंकजनेही काहीही आढेवेढे न घेता मुलीची भूमिका साकारली. मात्र मुलीची भूमिका साकारण्यापूर्वी पंकजने वडिलांची परवानगी घ्यावी असे दिग्दर्शकाने सुचवल्याने पंकजने घरी जाऊन वडिलांची परवानगी घेतली आणि त्यानतंरच मुलीची भूमिका साकारली होती. त्याची मुलीची भूमिका गावातील सगळ्यांना प्रचंड आवडली होती. एवढेच नव्हे तर हा मुलगी बनून बॉलिवूडमध्ये गेला तर सगळ्यांची छुट्टी करेल असेही म्हटले गेल्याची आठवणही पंकजने सांगितली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER