
मुंबई : बहुजन विकास आघाडीचे नेते क्षितिज ठाकूर यांचे खंदे समर्थक पंकज देशमुख (Pankaj Deshmukh) यांनी अखेर शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला आहे .
शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत ‘वर्षा’ निवासस्थानी शिवबंधन हाती बांधले. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे, संपर्कप्रमुख रवींद्र पाठक उपस्थित होते. ‘बविआ’चे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या काळात केलेले काम पाहून मी शिवसेनेत प्रवेश केला आहे, अशी प्रतिक्रिया पंकज देशमुख यांनी पक्षप्रवेशानंतर व्यक्त केली. पंकज देशमुख यांच्यासोबत वसई तालुक्यातील इतर समाजातील चार प्रमुख नेत्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. आदिवासी एकता परिषदेचे दत्ता सांबरे, प्रकाश जाधव, वंदना जाधव आणि जनआंदोलन समितीचे गॉडसन रॉड्रिक्स यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
सौजन्य :-Lokशाही
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला