पंजाबमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्याची मतदानाला जाताना हत्या

Punjab -Congress Leader-Murder-Lok Sabha Election 2019

हरियाणा :- लोकसभा निवडणुकीच्या सातव्या व शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी पंजाबमधील खडूरसाहिब येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हत्या झाल्याची धक्कादायक माहिती  आहे . हा कार्यकर्ता मतदानाला जात होता. अकाली दलाच्या कार्यकर्त्यावर हत्येचा आरोप करण्यात आला आहे.

माहितीनुसार , खडूरसाहिबमधल्या सरली गावात मतदान करण्यासाठी चाललेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याची धारदार शस्त्राने वार करून  हत्या करण्यात आली. अकाली दलाचा कार्यकर्ता आणि काँग्रेस कार्यकर्ता या दोघांमध्ये खूप दिवसांपासून वादावादी सुरू होती. या आधीही त्या दोघांचं भांडण झालं होतं. ऐन मतदानाच्या दिवशीच हत्या झाल्याने सरली गावात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या म्हणजे सातव्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगाल, बिहार, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, झारखंड या राज्यांसह चंदीगड येथे अखेरच्या टप्प्यातील मतदान होत आहे.