पाणीपुरी, न्यूडल्समधून ४० जणांना विषबाधा; एक बालिका दगावली

poisoned from noodles - Maharastra today

भंडारा :- जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील भेंडाळा गावात पाणीपुरी व नूडल्स खाल्ल्याने ३०-४० जणांना विषबाधा झाली. बाधित राखी सती बावणे (१२) या बालिकेचा मृत्यू झाला. बाधितांवरील उपचारासाठी आरोग्य पथक गावात पोहचले आहे.

३०-४० जणांना विषबाधा

रविवारी बाजारामध्ये नूडल्स खाल्ल्याने लोकांना उलट्या आणि जुलाबचा त्रास सुरू झाला. गावातील जवळ ३०-४० लोकांना विषबाधा झाल्याचे लक्षात आहे. काही लोकांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय पवनी येथे हलवण्यात आले आहे.

पाणीपुरी आणि न्यूडल्स खाल्ले होते

भेंडाळा येथे रविवारी आठवडी बाजार होता. बाजारात पाणीपुरी आणि चायनीजचे ठेले लागले होते. पाणीपुरी आणि नूडल्स खाणाऱ्यांना सोमवारी त्रास जाणवू लागला. रामदास सती बावने यांच्या कुटुंबातील मुलांनीही नूडल्स खाल्ले होते. सोमवारपासून या मुलांना उलट्या सुरू झाल्या. मंगळवारी राखी या बालिकेची प्रकृती जास्त झाली. तिला उपचारासाठी पवनी येथे नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला.

गावातील बऱ्याच लोकांना अजूनही त्रास सुरू असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राखीच्या मृत्यूनंतर गावात विषबाधा झाल्याची माहिती पोलीस पाटलांनी आरोग्य यंत्रणेला दिली. आरोग्य यंत्रणा गावात पोहचली. रुग्णांच्या घरी जाऊन माहिती गोळा करणे सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER