पाणीपट्टी थकीत : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा बंगला ‘डिफॉल्टर’ घोषित

- थकबाकीदारात मंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांचाही समावेश

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या वर्षा बंगल्यासह अनेक मंत्र्यांकडे शासकीय निवासस्थानाची पाणीपट्टी थकली आहे. पाणीपट्टीची ही रक्कम २४ लाख ५६ हजार ४६९ आहे. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी काढलेल्या माहितीच्या अधिकारातून ही माहिती उघड झाली आहे. मुंबई महापालिकेने मुख्यमंत्र्यांचा ‘वर्षा’ बंगला ‘डिफॉल्टर’ यादीत टाकला आहे! शकील अहमद शेख यांनी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरील पाण्याच्या थकबाकीदारांची माहिती गोळा केली आहे.

माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ‘वर्षा’ बंगला, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षाकर्मचाऱ्यांसाठीचा ‘तोरणा’ बंगला, अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा ‘देवगिरी’, जयंत पाटील (Jayant Patil) यांचा ‘सेवासदन’, ऊर्जा मंत्री नितीन राउत (Nitin Raut) यांचा ‘पर्णकुटी’, राजेश टोपे (Rajesh Tope) यांचा ‘जेतवन’ आणि इतर मंत्र्यांच्या बंगल्यांचीही पाणीपट्टी थकली आहे. यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा ‘सागर’चाही समावेश आहे.

https://lh3.googleusercontent.com/-BcUpH_4hnHY/X9c-QEtYd-I/AAAAAAAABPY/gIWzk6e6FbcecoyAYWLpvkLr4NUU5AmpACK8BGAsYHg/s0/BMC.jpg

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER