कोरोनाच्या भीतीने मंदिरा बेदीला पॅनिक अटॅक

मुंबई :- कोरोना विषाणूमुळे देशभरातील वातावरण नकारात्मक झाले असून यामुळे पॅनिक अटॅक आल्याचा खुलासा अभिनेत्री मंदिरा बेदीने केला आहे. मंदिरा नुकतीच ऑस्ट्रेलियाहून परतली. ऑस्ट्रेलियाहून आल्यापासून ती स्वविलगीकरणात आहे.

मंदिरा म्हणाली, “वुमेन क्रिकेट वर्ल्ड कपसाठी मी ऑस्ट्रेलियाला गेले होते. ९ मार्च रोजी मी भारतात परतली. मी सेल्फ आयसोलेशनमध्ये होते आणि दिवसागणिक माझी चिंता वाढत होती. कारण करोना विषाणूची लक्षणं १४ दिवसांत दिसतात.” एका वेबसाइटला दिलेल्या या मुलाखतीत मंदिरा बेदी म्हणाली की इतकी घाबरलेली होती की मला अस्थमा अटॅक आला. त्याच्या एक दिवसापूर्वी तिने करोना विषाणूशी संबंधित नकारात्मक व्हिडीओ पाहिला होता. तेव्हापासून मंदिरा लोकांना अफवांपासून दूर राहण्याचं आवाहन करत आहे. सकारात्मक गोष्टींवर आपलं लक्ष केंद्रीत करा असं ती सांगतेय.


Web Title : Panic attack on mandira Bedi for fear of Corona

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)