सुशांतसाठी श्रीलंकेत फलक ! बहीण श्वेता म्हणाली.. ‘THANK YOU SRILANKA’

Shweta Singh Kirti - Sushant Singh Rajput

नवी दिल्ली : अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) निधनाला आता चार महिने झालेत. त्याची हत्या की आत्महत्या यावर अजूही वाद सुरु आहे. त्याचे चाहते आणि बहीण श्वेता सिंग किर्ती (Shweta Singh Kirti) त्याला न्याय मिळावा म्हणून सतत सोशल मीडियावर सक्रिय आहेत.

श्वेता काही दिवस यासाठी सोशल मीडियावर सतत मोहीम चालवत होती. फोटो शेअर करत होती. आता तिने एक फोटो शेअर केला आहे. त्यात सुशांत सिंगच्या चाहत्यांनी श्रीलंकेत लावलेला फलक आहे. सुशांतला न्याय मिळवण्यासाठी आता श्रीलंकेतही आजाव उठतो आहे, असे फलकाचा फोटो शेअर करत तिने लिहिले आहे.

काही फोटो ट्विट केले आणि त्याला ‘धन्यवाद श्रीलंका’ असे कॅप्शन दिले आहे. या फोटोसाठी सुशांतच्या चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहे. अनेकांनी ‘जस्टीस फॉर सुशांत’ अशी मोहीम सोशल मीडियावर चालवली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER