नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावावरून पनवेलमध्ये ‘फलक युद्ध’

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Navi Mumbai International Airport) दि. बा.पाटील (D B.Patil) यांचे नाव द्या, अशी मागणी असताना एका गटाने बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे नाव देण्याची मागणी केली. यावरून सुरू झालेला वाद आता चिघळला आहे. पनवेलमध्ये, ‘आमच्या मनाने घेतलाय ठाव, आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव’ या फलकाच्या विरोधात आम्ही साहेबांचेच देणार नाव अशा आशयाचे फलक झळकले आहेत.

विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव सिडकोने शासनाकडे पाठवल्यानंतर हा वाद सुरू झाला आहे. सुरुवातीला शिवसेना विरुद्ध प्रकल्पग्रस्त असा संघर्ष सुरू होता. त्यानंतर स्थानिक शिवसेनेसह काँग्रेसने आघाडी धर्म पाळत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला पाठिंबा जाहीर केला. राष्ट्रवादीने मात्र अद्याप भूमिका स्पष्ट केली नाही.

आता विमानतळ प्रकल्पग्रस्त संघटनेने आंदोलनाचा इशारा देत दि. बा. पाटील यांच्या नावाचा आग्रह धरला असून शुक्रवारी पत्रकार परिषदेत आंदोलनाची दिशा जाहीर केली आहे. त्यानंतर पनवेल शहरात हे फलक युद्ध सुरू झाले. दि. बा. पाटील यांच्यासाठी स्थानिक भूमिपूत्र आणि भारतीय जनता पक्ष सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. तर, शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी शिवसैनिकांना बाळासाहेब ठाकरे यांच्या नावासाठी जोर लावण्याचे आवाहन केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button