बेळगावच्या पंडित शर्मानी काढला राममंदिर भूमीपूजनाचा मुहूर्त

बेळगाव : ऐतिहासिक राम मंदिराचे(Ram Mandir) भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांच्या हस्ते ५ ऑगस्टला होणार आहे. भूमीपूजनाचा मुहूर्त बेळगाव येथील पंडितांनी काढून दिला आहे. संपूर्ण भारताचे या दिवसाकडे लक्ष लागले आहे.

बेळगावच्या श्री राघवेंद्र स्वामी नव वृंदावनचे प्रमुख पंडित एन. आर. विजयेन्द्र शर्मा यांनी राम मंदिराच्या भूमी पूजनाचा मुहूर्त काढून दिला आहे. अयोध्येतील राम मंदिराचे ट्रस्टी स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांनी शर्मा यांना राममंदिर भूमीपूजनासाठी शुभ मुहूर्त काढून देण्याची विंनती केली होती. शर्मा यांनी त्यांना चार शुभ मुहूर्त पाठवले होते. १) २९ जुलै सकाळी नऊनंतर, २) ३१ जुलै सकाळी सात ते नऊ दरम्यान, ३) ३ ऑगस्ट सकाळी दहानंतर आणि ४) ५ ऑगस्ट रोजी संपूर्ण दिवस, असे ते चार मुहूर्त होते. त्यापैकी पाच ऑगस्टचा मुहूर्त राम मंदिर भूमीपूजनासाठी निश्चित करण्यात आला आहे. हे चार मुहूर्त १५ जूनला स्वतः पत्र लिहून शर्मा यांनी स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांना कळवले होते.

राम मंदिर भूमिपूजनासाठी ५ ऑगस्ट हाच दिवस का निश्चित करण्याचे कारण म्हणजे, वास्तुशास्त्रानुसार हा शुभ मुहूर्त असल्याचे पंचांग अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. या दिवसाला पौराणिक आणि आधुनिक भारताच्या इतिहासात देखील महत्त्व आहे. राम मंदिर निर्माण हा एक सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या महत्वाचा विषय असल्याचे सोमण म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER