भाजप-राष्ट्रवादीत जुंपली ; पंढरीची पायी वारी करण्यावरून आरोप -प्रत्यारोप

pandharpur-wari-ncp-attacks-bjp

मुंबई: राज्यात कोरोनाच्या (Corona Virus) संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे . या पार्श्वभूमीवर सध्या राज्यभरात धार्मिक कार्यक्रम, यात्रा व उत्सवांवर निर्बंध आहेत. वारकऱ्यांनी वारीचा आग्रह धरू नये असे राज्य सरकारचे आवाहन आहे. मात्र, यंदा पायी वारी झालीच पाहिजे अशी भूमिका भारतीय जनता पक्षाने घेतली आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) व भाजपमध्ये (BJP) वादंग पेटले आहे .

आषाढी वारी ऐन तोंडावर असताना पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे. यावर्षी पायी वारी झालीच पाहिजे, असा आग्रह भाजपनं धरला आहे. निर्बंधासह का असेना, पण पायी वारी व्हावी अशी वारकऱ्यांची इच्छा असल्याचा दावा भाजपनं केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी वेळकाढूपणा न करता त्वरीत वारकऱ्यांसोबत चर्चा करुन नियमावली तयार करावी. पायी वारीच्या बाबतीत यंदा आम्ही कोणतीही तडजोड स्वीकारणार नाही, असा इशारा भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले (Tushar Bhosle) यांनी दिला आहे.भाजपच्या या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून निशाणा साधण्यात आला .

तुषार भोसले हा वारकऱ्यांचा प्रतिनिधी नसून वारकऱ्यांच्या जिवाशी खेळणारा एक भोंदू व्यक्ती आहे. हा माणूस वारी व्हावी अशी मागणी आज करतोय. पण, या वारीमध्ये करोनाचा संसर्ग वाढल्यास आमच्या वारकरी बांधवांच्या जीविताला जो धोका निर्माण होईल, त्याविषयी या माणसाला काहीच घेणेदेणे नाही, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते भूषण राऊत यांनी म्हटले आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button