पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक : राजू शेट्टींनी प्रचारसाठी वापरली ‘ही’ भन्नाट आयडिया

Raju Shetty - Maharastra Today

मुंबई :- पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी (Pandharpur-Mangalvedha by-election) सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपने समाधान अवताडे यांना उमेदवारी दिली आहे. तर भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांना राष्ट्रवादीने निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सचिन शिंदे यांना उमेदवारी दिल्याने आता पंढरपुरात तिरंगी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत सचिन शिंदेंच्या  प्रचारासाठी स्वतः राजू शेट्टी गेले आठवडाभर मतदारसंघात तळ ठोकून आहेत. राजू  शेट्टी (Raju Shetti) स्वतः मैदानात उतरल्यामुळे कार्यकर्तेदेखील उत्साहात आहेत. आज राजू शेट्टींनी भल्या पहाटे पंढरपुरातील पालखी मार्गावरील जाॅगिंग ट्रॅक गाठला. सकाळी सकाळी येणाऱ्या प्रत्येकाला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा व सोबत मतदान पत्रिका देऊन ते मतदारांना मतदानाचे आवाहन करत होते. थेट सकाळीच मतदारांशी संवाद साधल्याने त्यांचा हा प्रचार आज संपूर्ण पंढरपूर शहरासह तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांच्या  या प्रचाराला लोक प्रतिसाद देत आहेत.

ही बातमी पण वाचा : पंढरपुरात देवेंद्र फडणवीसांच्या सभांचा धडाका ; भाजपलाही पंढरपुरात पावसाच्या चमत्काराची आस!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button