पंढरपूरची मंदिर समिती शिवसेनेकडे; नवीन मंदिर समित्यांसाठी राजकीय हालचालींना सुरुवात

Pandharpur Temple

मुंबई :- राज्यातील मंदिर समिती बरखास्त करुन नवीन समिती गठित करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. महाविकासआघाडीतील (Mahavikas Aghadi) मित्रपक्षांनी वाटून घेतलेल्या समित्यांमध्ये पंढरपूरची मंदिर (Pandharpur Temple) समिती शिवसेनेकडे (Shiv Sena) गेली, असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीवर शिवसेनेचा अध्यक्ष बसणार आहे.

राज्यातील महाविकासआघाडीची सत्ता आल्यानंतर सरकारने अनेक महामंडळे बरखास्त केली होती. पण देवस्थान समित्यांमध्ये कोणतेही बदल केले नव्हते. मात्र आता भाजपच्या ताब्यातील देवस्थान समित्या काढून घेण्यासाठी राज्य पातळीवर घडामोडी सुरु झाल्या आहेत.

दरम्यान या मंदिर समितीवर वर्णी लावण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पदाधिकाऱ्यांनी लॉबिंग सुरु केले आहे. यामुळे अनेक नेत्यांनी पक्षातील नेत्यांच्या गाठीभेटी सुरु केल्या आहेत.

ही बातमी पण वाचा : … तरीही देशव्यापी संप झाला हे सरकारपुरस्कृत अराजकाला चोख उत्तर : शिवसेना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER