पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक : दहाव्या फेरीअखेर समाधान आवताडेंची आघाडी

Maharashtra Today

मुंबई : पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे . राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा आज रविवारी (2 मे) निकाल लागणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके विजयी होणार की भाजपचे उमेदवार समाधान आवताडे बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आठव्या फेरीत भाजपाचे समाधान अवताडे आघाडीवर आहे तर भगीरथ भालके हे सध्या पिछाडीवर आहे . आवताडे यांना 20213 इतके मत मिळाले असून भगीरथ भालके 19380 इतक्या मतावर आहेत . त्यानंतर अपक्ष उमेदवार शैला गोडसे 51 , स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे : 0 , अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10 इतक्या मतावर आहेत .

दहा फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर समाधान आवताडेंना 1838 मताची आघाडी मिळाली आहे. त्यामुळे, येथील निवडणुकीत चांगलीच चूरस पाहायला मिळत आहे. ज्या भागात राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांना मताधिक्याची अपेक्षा होती, त्याच भागात समाधान आवताडे यांनी चांगलीच आघाडी घेतली आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button