पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक मतदान सुरु ; राष्ट्रवादी – भाजपा आमनेसामने , कोण मारणार बाजी?

NCP - BJP - Maharastra Today
NCP - BJP - Maharastra Today

मुंबई :- राष्ट्रवादीचे नेते भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आज (17 एप्रिल ) मतदान होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून या ठिकाणी मतदानाला सुरुवात झाली आहे. कोरोनामुळे हे मतदान 12 तासांचे असणार आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके, भाजपकडून समाधान आवताडे, स्वाभिमानीचे सचिन शिंदे, अपक्ष शैला गोडसे, सिद्धेश्वर आवताडे यांच्यासह 19 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे यासर्वांचे भाग्य मतदान पेटीत बंद होणार आहे .

पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघात एकूण 3 लाख 2 हजार 914 मतदार आहेत. त्यात 1 लाख 43 हजार 746 महिला तर 1 लाख 59 हजार 167 पुरुष मतदार आहेत. या पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी 328 मूळ मतदान केंद्र असून 196 सहायक मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रासाठी 524 कंट्रोल युनिट, 1048 बॅलेट युनिट, 524 विवी पॅट मशीन, 210 कंट्रोल युनिट, 420 बॅलेट युनिट राखीव आहेत. तसेच या निवडणुकीसाठी 2552 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button