ऐन पोटनिवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला खिंडार; पंढरपुरातील राष्ट्रवादीचा बडा नेता भाजपात

Pandharpur by-elections NCP big leader joins BJP

पंढरपूर : मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Mangalvedha-Pandharpur Assembly by-election) मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना भाजपाने (BJP) राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) मोठा धक्का दिला आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच नेते भगीरथ भालकेंना निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना एका मोठ्या नेत्याने राष्ट्रवादीला राम राम ठोकून भाजपात प्रवेश केला.

भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील काल पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला. चंद्रकांत पाटील, माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील महत्त्वाचे युवा नेता सागर यादव यांनी आपल्या सर्व समर्थकांसोबत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर यादव यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकल्याने याचा फटका भगीरथ भालके यांना बसणार असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे.

पक्षप्रवेशानंतर सागर यादव यांनी पंढरपूर-मंगळवेढ्याच्या पोटनिवडणुकीत भाजपा व मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार समाधान आवताडे यांना विजयी करण्याचा संकल्प केला. या प्रसंगी चंद्रकांत पाटील यांनी आघाडी सरकारवर घणाघाती टीका करतानाच सरकार पडण्याचं भाकीतही केलं. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. या सरकारकडे काहीच नियोजन नाही, प्लॅनिंग नाही. सरकारमध्ये विलपॉवर कमी आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेतला जात नाही. इयत्ता आठवीतला मुलगाही राजकीय विश्लेषण करू शकेल. हे सरकार लवकरच पडेल. विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमची भूमिका योग्य पद्धतीने बजावत आहोत, असेही पाटील म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button