पंढरपूर पोटनिवडणूक : पवारांचा शब्द, पक्षाकडून भगीरथ भालकेंना मॅसेज? प्रचारही सुरू

Maharashtra Today

पंढरपूर :- मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके (Bharat Bhalke) यांच्या अकाली निधनामुळे या ठिकाणी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या मतदार संघात भारत भालके यांचे वर्चस्व होते. तसेच मतदार संघातील लोकांचा त्यांच्याप्रती विशेष लागावं होता. त्यामुळे या पोटनिवडणुकीत भालके कुटुंबातील सदस्यलाच उमेदवारी देण्याचा शब्द खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिला होता. तसेच ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छाही बोलून दाखवली होती. त्यामुळे दिलेला शब्द पवार पूर्ण करणार का? असा प्रश्न मतदार संघात विचारला जात होता. मात्र आता पवारांनी शब्द पाळल्याची शक्यता भगीरथ भालके यांनी दिलेल्या माहितीवरुन वाटू लागली आहे.

या निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार मीच आहे, तसा पक्षाकडून आपल्याला मेसेज प्राप्त झाला आहे, अशी माहिती भगीरथ भालके यांनी दिली आहे. तसेच त्यांनी प्रचाराचे नियोजन चार दिवसांपासून प्रचारालाही सुरूवात केली आहे. मतदार संघात अनेक ठिकाणी सभा, छोट्या बैठका आणि मतदारांच्या भेटीगाठी घेण्याचा सपाटा त्यांनी सुरू केला आहे. येत्या दोन दिवसात पक्षाकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तर दुसरीकडे, भाजपकडून प्रशांत परिचारक किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणाला उमेदवारी देण्यात येईल, अशी चर्चा होती. मात्र पक्षाकडून समाधान आवताडेला उमेदवारी देण्याबाबत अनुकूल वातावरण असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर परिचारक यांनी बाजार समितीच्या कार्यालयात सलग दोन दिवस प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठका घेत पक्ष देईल तो उमेदवार निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन करत आपण निवडणुकीत उतरणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर त्यांचे समर्थक असलेले नगराध्यक्षा साधना भोसले यांचे पती नागेश भोसले यांनी मात्र उमेदवारी अर्ज घेऊन परिचारक नसतील तर आपण मैदानात उतरणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे परिचारक गटाची भूमिका येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

ही बातमी पण वाचा : शरद पवार शिवसेनेचे की राष्ट्रवादी काँग्रेसचे, तपासण्याची गरज; नाना पटोलेंचा टोमणा 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER