पंढरपूर पोटनिवडणूक : राष्ट्रवादीकडून जयश्री भालके यांचे नाव जवळपास निश्चित

NCP Logo

पंढरपूर :- मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक नुकतीच जाहीर झाली आहे. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर या ठिकाणी ही पोटनिवडणूक होणार आहे. पुढील महिन्यात १७ एप्रिलला इथे मतदान तर २ मे रोजी निकाल लागणार आहे. महाविकास आघाडीपासून (Mahavikas Aghadi) ते भाजपपर्यंत (BJP) उमेदवारांची चर्चा रंगू लागली आहे. त्यातच राष्ट्रवादीकडून (NCP) दिवंगत आमदार भारत नाना भालके (Bharat Nana Bhalke) यांच्या पत्नी जयश्री भालके (Jayshree Bhalke) यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. राष्ट्रवादीकडून महिला चेहरा दिल्यास, भाजपकडून महिला चेहरा समोर येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे आमदार प्रशांत परिचारक यांनी सध्या तरी शांत बसण्याची भूमिका घेतली आहे.

मात्र त्यांच्या गटाच्या नगराध्यक्ष साधना भोसले किंवा त्यांचे पती नागेश भोसले यांचे नाव ते पुढे करू शकतात. शिवसेनेच्या नेत्या शैला गोडसे यांनी भाजपाशी जवळीक साधत शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली. त्यांनी आता भाजपामधून उमेदवारी मिळण्याची तयारी केली आहे. तर दामाजी सहकारी कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांनी अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. यामुळे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होणार असल्याचे सध्या तरी दिसत आहे. दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या अकाली मृत्यूमुळे मतदारसंघात भालके कुटुंबाविषयी सहानुभूतीची लाट आहे.

मात्र भारत नाना भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांच्यापेक्षा जयश्री भालके यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर, लाटेवर निवडून येण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांकडून भारत भालके यांच्या पत्नी जयश्री भालके यांना उमेदवारी देण्यासाठी जोर देत आहेत.

ही बातमी पण वाचा : पंढरपूर पोटनिवडणूक : पवारांच्या शब्दानुसार यांना मिळणार राष्ट्रवादीचे तिकीट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER