पंढरपूरची पोटनिवडणूक बिनविरोध नाही; भाजप उमेदवार देणार, तर राष्ट्रवादी शांत

bjp-ncp

सोलापूर : पंढरपूर विधानसभा (Pandharpur election) मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके (Bharat Bhalke) याच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या जागेसाठी लवकरच पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. दरम्यन, ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचा भर आहे. मात्र आता ही चांगलीच चुरशीची होण्याची दाट शक्यता आहेत. पोटनिवडणुकीची अधिकृत घोषणा झाली नसली तरी, त्यासाठी भाजपने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यासाठी भाजप पदाधिकऱ्यांची नुकतीच बैठक झाली असून ही निवडणूक बिनविरोध न होऊ देता, उमेदवार देण्याची घोषणा भाजपने केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पंढरपूर-मंगळवेढा या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आमदार प्रशांत परिचारक यांचे पुतणे प्रणव परिचारक यांच्या नावाची सर्वसंमतीने मागणी करण्यात आली. राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार भारत भालके यांचे २७ नोव्हेंबर २०२० रोजी निधन झाले.

त्यांच्या निधनानंतर पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची जागा रिक्त झाली. त्यामुळे येथे लकवरच पोटनिवडणूक होणार आहे. ही शक्यता लक्षात घेऊन भाजपने राजकीय डावपेच आखाण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी येथील भाजप नेते प्रशांत परिचारक यांच्या गटाची नुकतीच बैठक झाली असून निवडणुकीसाठी योग्य उमेदवाराची चाचपणी सुरू झाली. या जागेसाठी भाजप नेते प्रशांत परिचारक यांचे पुतणे प्रणव परिचारक यांना उमेदवारी देण्याची या बैठकीत मागणी करण्यात आली. त्यामुळे भारत भालके यांच्या मृत्यूनंतर पंढरपूर येथील पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याचं म्हटलं जात आहे. भाजपने पोटनिवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. दरम्यान, भारत भालके यांच्या मृत्यूनंतर पंढरपूरची जागा रिक्त झाल्यांतर त्या ठिकाणी राष्ट्रवादीकडूनसुद्धा योग्य उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. मात्र, राष्ट्रवादीतून दोन वेगवेगळे मतप्रवाह निर्माण झाले आहेत.

भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांच्याविरोधात काही राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी शड्डू ठोकला आहे. त्यामुळे येथे योग्य उमेदवाराच्या निवडीसाठी राष्ट्रवादीसमोर पेच निर्माण झाल्याचं सांगण्यात येतं. भगीरथ भालके यांना काही पदाधिकाऱ्यांनी उघडपणे विरोध केल्यामुळे राज्य पातळीवरील नेतृत्वानेसुद्धा  याबाबत अद्याप मौन बाळगले आहे. दरम्यान, भाजपने प्रणव परिचारक यांचे नाव पुढे करत ही निवडणूक लढण्याचा इशारा दिला असताना दुसरीकडे राष्ट्रवादी अजूनही शांत आहे.

पण भाजपने ही निवडणूक बिनविरोध न होऊ देता उमेदवार देण्याचे संकेत दिल्यामुळे आगामी काळात उमेदवार निवडीसाठी राष्ट्रवादी हालचाल करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच, भगीरथ भालके यांच्या नावाला विरोध होत असल्यामुळे राष्ट्रवादी काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER