पंढरपूर पोटनिवडणूक : एक्झिट पोलनुसार भाजपचे समाधान आवताडे विजयाचा गुलाल उधळणार

Samadhan Awatade-Bhagirath Bhalke

पंढरपूर :- राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा निकालाची संपूर्ण महाराष्ट्र वाट बघत आहे. या निवडणुकीचा निकाल उद्या हाती येणार आहे. ही पोटनिवडणूक राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) विजयी होणार की भाजपचे उमेदवार समाधान आवताडे (Samadhan Awatade) बाजी मारणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

उद्या रविवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरूवात होणार आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत या निवडणुकीचं चित्रं स्पष्ट होईल. तसेच दुपारी ३ वाजेच्या आत या निवडणुकीचा निकाल हाती येण्याची शक्यता आहे. मात्र कोरोनाच्या नियमांचं पालन करूनच मतमोजणी होणार असल्याने निकाल हाती येण्यास उशिर होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

या निवडणुकीनंतर पुण्याच्या ‘द स्ट्रेलेमा’ या संस्थेने एक्झिट पोल जाहीर केला आहे. त्यानुसार भगीरथ भालके यांना ९५,५०८, समाधान आवताडे यांना ९८,९४६, अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे यांना ७,१२४, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे (Sachin Shinde) यांना ८,६१९, अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांना ६,५९६आणि इतरांना ८,६९३ मते मिळणार आहे. एक्झिट पोलनुसार समाधान आवताडे हे ३,४३८ मताधिक्य घेऊन विजयी होणार असल्याचं म्हटलं आहे. म्हणजे दोन टक्के मतांनी आवताडे यांचा विजय होताना दिसत आहे. उपलब्ध संसाधने आणि सहानूभूती या स्पर्धेत संसाधनांनी सहानूभूतीवर मात केल्याचंही या निष्कर्षात नमूद केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button