पंढरपूर पोटनिवडणूक : भाजपकडून समाधान आवताडेंना उमेदवारी

Samadhan Awatade

पंढरपूर : मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे (NCP) आमदार भारत भालके (Bharat Bhalke) यांच्या अकाली निधनामुळे या ठिकाणी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीत भाजपकडून (BJP) प्रशांत परिचारक किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणाला उमेदवारी देण्यात येईल, अशी चर्चा होती. मात्र भाजपने समाधान आवताडेला (Samadhan Awatade) उमेदवारी देण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध न होता चांगलीच चुरशीची होणार असल्याचे बोललं जात आहे.

पंढरपूर- मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून समाधान महादेव आवताडे यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. आवताडे यांनी २०१४ ला शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. तर २०१९ ला ते अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. समाधान आवताडे हे उद्योजक आहेत. समाधान आवताडे यांना आमदार परिचारक गटाने पाठिंबा दिल्याने त्यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button