पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का, उमेदवार समाधान आवताडेंच्या घरातूनच आव्हान

Maharashtra Today

मुंबई : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (pandharpur-assembly-constituency-by-election) सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे . या मतदारसंघात भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी (NCP) आमने-सामने असून दोन्ही पक्षांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. भाजपने समाधान आवताडे(Samadhan avtade ) यांना उमेदवारी दिल्यानंतर राष्ट्रवादीने दिवंगत आमदार भारत भालके(Bharat Bhalke) यांचे सुपुत्र भगिरथ भालके यांना मैदानात उतरवले .

दोन्हीही उमेदवार तगडे असल्याने उत्सुकता निर्माण झालेली असतानाच भाजप उमेदवार समाधान आवताडे यांना मात्र मोठा धक्का बसला आहे. कारण आवताडे यांच्यासमोर आता त्यांच्या घरातूनच आव्हान उभं राहिले आहे.

समाधान आवताडे यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर आवताडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने समाधान आवताडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सिद्धेश्वर आवताडेंनी समजूत काढण्यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले. सिद्धेश्वर आवताडे यांच्या उमेदवारीमुळे समाधान आवताडेंसमोर मतविभागणीचे मोठे संकट उभे आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button