
कोल्हापूर : शिरोळ येथील पंचगंगा नदीत (Panchganga River) प्रदूषणामुळे मृत माशांचा खच पडला आहे. मृत मासे खाण्यासाठी नदीमध्ये मगरींचा वावर वाढला आहे. नदीमध्ये मगरी मृत मासे खात असल्याचे सर्रास दिसून येेेत आहे. यामुुळे भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांच्या जीवितास धोका वाढला आहे. प्रशासनाने वेळीच याकडे लक्ष देण्याची गरज आहे, अन्यथा स्थानिक नागरिकांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मागील काही दिवसांपासून पंचगंगा नदीच्या शिरोळ बंधाऱ्यात मृत माशांचा अक्षरशः खच पाहायला मिळत आहे. त्यामुळे या संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. पाणी पुरवठा विभागामार्फत मृत मासे बाहेर काढले जात आहेत. नदीत तरंगणाऱ्या मृत मासे खण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून शिरोळ येथील धरणाच्या पूर्व आणि पश्चिम बाजूच्या पात्रात मगरींचे वारंवार दिसून येत आहे. प्रदूषणाच्या मुख्य मुद्द्याकडे अद्यापही दुर्लक्ष केले जात असल्याचे स्थानिकांनी म्हटले असून प्रदूषणास जबाबदार सर्वच घटकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला