पंचगंगा नदीने प्रदूषणाची पातळी ओलांडली : मृत माशांचा खच

Panchganga River - Dead Fish

कोल्हापूर :- येथील पंचगंगा नदीला (Panchganga River) रसायन व मळीमिश्रित पाणी आल्याने हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत. दूषित, दुर्गधीयुक्त प्रदूषित पाण्याची तीव्रता कमी करण्यासाठी पाटबंधारे विभागाने रूई व तेरवाड बंधाऱ्यांतून स्वच्छ पाणी शिरोळ बंधाऱ्यात सोडण्याची शक्कल लढवली आहे. दरम्यान, पंचगंगा नदीकाठावरील साखर कारखान्यांचे मळीमिश्रित दूषित पाणी नदीपात्रात सोडल्याने प्रदूषणात भर पडत आहे.

पंचगंगा नदीपात्रात रसायनयुक्त सांडपाणी आल्याने नदी प्रदूषित झाली आहे. शिरढोण पूल ते तेरवाड बंधाऱ्याजवळ जलचर प्राण्यांना ऑक्सिजन मिळत नसल्याने तडफडत आहेत. नदीकाठावर दुर्गंधी सुटली आहे. शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंचगंगा प्रदूषणप्रश्नी रोखठोक भूमि घेत नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर कारवाई करावी, प्रदूषण रोखावे, असा आदेश दिला असून हा आदेश धाब्यावर बसवून प्रदूषित घटक नदी प्रदूषित करीत आहेत. कोल्हापूर, इचलकरंजी शहराबरोबरच परिसरातील सांडपाणी तसेच औद्योगिक वसाहतींतील कारखाने व अन्य उद्योगांचे सांडपाणी, प्रोसेसर्सचे पाणी थेट पंचागंगा नदीत मिसळत असल्याने याचा मोठा फटका शिरोळ तालुक्यातील नदीकाठच्या गावांना बसत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER