पंचायत समितीचा अधिकार वाढवणार : हसन मुश्रीफ

Hassan Mushrif

कोल्हापूर : राज्यातील पंचायत समितींच्या अधिकारात वाढ करणार असल्याचे महत्त्वपूर्ण घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरातील एका कार्यक्रमात केली.

जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थित झाले.

जिल्हा परिषदेचा कारभार चांगला करा. कामाचा दर्जा चांगला ठेवा. संस्थेची बदनामी होईल, असे काही करू नका. अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी एकत्रित काम करावे. जिल्हा परिषदेची बदनामी होईल, असे काही करू नका. यापुढे ती आम्ही खपवून घेणार नाही असा सज्जड दम ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकारी पदाधिकारी यांना दिला.

महापौर आजरेकर यांनी केली रस्त्यांची स्वच्छता

अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी भरविण्यात येणाऱ्या स्पर्धेचा जिल्हा परिषद उपक्रम अतिशय चांगला आहे. जिल्हा परिषदेत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे काम लवकर करण्याचा प्रयत्न करावा. त्याला हेलपाटे मारावयास लावू नका. अलीकडील काळात जिल्हा परिषदेची बातमी नाही, असा एकही दिवस जात नाही. हे योग्य नाही. ग्रामपंचायतींना जादा अधिकार देण्यात आले आहेत. त्याप्रमाणे पंचायत समितींनाही अधिकार देण्याचा शासनाचा विचार आहे, असेही मंत्री मुश्रीफ म्हणाले.