पंचकर्म चिकित्सा – नस्य चिकित्सा

nasya ayurveda

वमन विरेचन बस्ति या तीन पंचकर्म चिकित्सेनंतर नस्य या पंचकर्म विषयी माहिती घेऊया. पंचकर्माच्या पाच कर्मामधील नस्य ही एक चिकित्सा आहे.

  • उर्ध्वजत्रुविकारेषु विशेषान्नस्यमिष्यते |
  • नासा हि शिरसो द्वारं तेन तद्व्याप्य हन्ति तान् ॥

खांद्यापासून वरील अवयव म्हणजेच गळ्यापासून शिरभागापर्यंत होणाऱ्या व्याधींवर नस्य कर्म विशेषरुपाने लाभदायक आहे. कारण नासिकाचे छिद्र शिरः प्रदेशाचे व्दार मानले आहे. त्यामुळे या नासिका व्दारातून नस्याव्दारे दिलेल्या औषधी सर्व अवयवांवर कार्य करून रोगांचे शमन करतात. नस्य पंचकर्मात सिद्धतेल, तूप, औषधीचूर्ण, दूध असे विविध द्रव्य नाकात सोडले जातात.

सर्व कर्ण नासा नेत्र गळ्याचे विकार, मायग्रेन, शिरःशूल, अनिद्रा अतिनिद्रा, अपस्मार, गलगण्ड, केसांचे विकार, केस गळणे, केस पांढरे होणे, अॅलोपेशिया, नाकाचे हाड वाढणे, अर्दीत (फेशियल पॅरालिसीस), प्रतिश्याय अशा विविध रोगांवर नस्य कर्म केले जाते. याशिवाय नस्याचा प्रभाव हार्मोन्स विषयीच्या व्याधींवर दिसून येतो. त्यामुळे वंध्यत्त्व, हार्मोनल imbalance मधे विशिष्ट औषधीचे तेल, तूप, रस नाकात सोडल्याने परीणाम दिसून येतो. इतके प्रभावी हे नस्य कर्म आहे.

नस्य (नाकात तेल वा तूप सोडणे) ही नित्य दिनचर्याचा एक भाग म्हणून देखील सांगितले आहे. त्याकरीता गाईचे तूप किंवा अणुतेल उपयोगी आहे. केसांचे आरोग्य, नेत्र कर्ण नाक स्वर गळा तसेच चेहरा यांचे स्वास्थ्य टिकविण्याकरीता हे रोज केलेले नस्य उपयोगी ठरते.

व्याधीकरीता सांगितलेले नस्य मात्र विशिष्ट त्या त्या व्याधीचा नाश करणाऱ्या औषधांचा उपयोग केला जातो. नस्याचे अनेक प्रकारही आयुर्वेद शास्त्रात सांगितले आहेत. उदा. नावन बृहण अवपीड धूम इ. सध्या कोरोना (Corona) संक्रमण काळात नाकात तेल टाकणे जास्त उपयोगी आहे. संक्रमण व प्रदुषण पासून नाकातील श्लेष्माचे संरक्षण होते. सर्दी कफरोग होण्यापासून बचाव करणे शक्य होते. असे हे नस्य पंचकर्म. वैद्याच्या सल्ल्याने नक्की सुरु करावे.

ही बातमी पण वाचा : आयुर्वेद पंचकर्म चिकित्सा – बस्तिकर्म

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER