पालघर जि.प. निवडणूक : राज ठाकरे आणि मोदींची छायाचित्रे एकाच फलकावर !

मुंबई :- पालघर जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या वाडा पंचायत समितीसाठी भाजपा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती झाल्याने या पॅनेलच्या निवडणूक फलकांवर नरेंद्र  मोदी आणि राज ठाकरे या दोघांची मोठमोठी  छायाचित्रे झळकली आहेत.  या संदर्भात उल्लेखनीय आहे की, २०१९ च्या निवडणुकीपासून राज ठाकरे हे भाजपा आणि त्यातही मोदी यांचे कडवे टीकाकार म्हणून पुढे आलेले आहेत.

मात्र स्थानिक पातळीवर मनसे आणि भाजपाचे कार्यकर्ते एकत्र आल्याने त्यांच्या निवडणूक फलकावर मत मागण्यासाठी मोदी आणि राज ठाकरे यांची छायाचित्रे झळकली आहेत. हे फलक मनसेने लावलेले नाहीत तर भाजपाने लावले आहेत, असा खुलासा मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला.

आता बंगलेवाटपावरून ठाकरे सरकारमध्ये नाराजी-नाट्य

मात्र, या निवडणुकीसाठी आमची भाजपाशी स्थानिक पातळीवर आघाडी झाली असल्याचे त्यांनी मान्य केले. काहीही असले तरी राज ठाकरे यांच्या टोकाच्या भाजपा आणि मोदी विरोधामुळे त्यांचे एकाच फलकावर लागलेले छायाचित्र हे जनतेत चर्चेचा विषय ठरले आहे.