पालघर पोलीस अधीक्षकांची बदली

Gaurav Singh

मुंबई : राज्य सरकारच्या गृह मंत्रालयाने आज एक आदेश जारी करत पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांची बदली केली आहे. त्यांच्या जागी महावितरण मुंबईचे कार्यकारी संचालक दत्तात्रेय शिंदे यांची नेमणूक केली आहे.

गौरव सिंग यांची बदली केली असली तरी अद्याप त्यांची कुठेही नियुक्ती केलेली नाही. त्यांच्या नियुक्तीसाठी स्वतंत्र आदेश काढण्यात येईल, असेही गृह विभागाने स्पष्ट केले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER