पालघर लिंचिंग प्रकरण : सक्तीच्या रजेवर पाठविलेल्या गौरव सिंह यांना पदोन्नती

Gaurav Singh - Palghar Lynching Case

मुंबई : पालघरच्या लिंचिंग प्रकरणानंतर (Palghar Lynching Case) पोलिस अधिक्षक गौरव सिंह (Gaurav Singh) यांना रजेवर पाटविण्यात आले होते. त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविल्यानंतर पाच महिन्यांनंतर पालघरचे जिल्हा पोलिस अधीक्षक गौरव सिंह यांना नवीन पद मिळाले आहे. राज्याच्या गृह विभागाने त्यांची महाराष्ट्र पोलिस अकादमी ( Maharashtra Police Academy), नाशिकचे एसपी म्हणून नियुक्ती केली.

राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) (CID) कासा पोलिसांकडून तपास घेतल्यानंतर सिंह यांना 8 मे रोजी रजेवर जाण्यास सांगण्यात आले होते.

16 एप्रिल रोजी रात्री लॉकडाऊन दरम्यान दोन साधू आणि त्यांचे चालक ठार झाले. कासा पोलिस हद्दीत हा गुन्हा घडला होता, लिंचिंग प्रकरणात गैरव्यवहार केल्याबद्दल त्यांच्यावर टीका झाली होती. पोलिसांच्या उपस्थितीत जमावाने साधूंना मारल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते.

या तपासात भाग घेतलेल्या दोन अधिका-यांना सिंग यांनी निलंबित केले होते. परंतु पोलिसांवर कारवाई करण्यासाठी राज्यावर दबाव निर्माण होताच सिंग यांना रजेवर पाठवण्यात आले. सिंग यांची बदली करण्यात यावी यासाठी ऑनलाइन याचिका हाती घेण्यात आली होती.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी त्यावेळी अचानक पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची कारवाई केली होती. आता पाच महिन्यानंतर सिंह यांची पुन्हा नाशिक येथे एस पी म्हणून बदली करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER