घरात पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडले : वृत्ताबाबत प्रताप सरनाईकांचा ‘हक्कभंग प्रस्ताव’

Pratap Sarnaik

मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांचा घरात पाकिस्तानी क्रेडिट कार्ड (Pakistani credit card) सापडले, असे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी प्रसारित केले. सोशल मीडियावरही (Social media)आले; अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) हिनेही यावर ट्विट केले.  या सर्वांविरुद्ध मी विधानसभा अध्यक्षांकडे हक्कभंग प्रस्ताव सादर केला, अशी माहिती सरनाईक यांनी दिली. राज्याच्या विधिमंडळाचे दोन दिवसांचे हिवाळी अधिवेशन आज सुरू झाले. यानिमित्त प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

त्यांच्या घरी पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडल्याचा दावा फेटाळून लावला. याबाबत अभिनेत्री कंगना राणावतने एक ट्विट केलं होतं, ज्यामध्ये मी मुंबईत आल्यानंतर तोंड फोडण्याची गोष्ट करणाऱ्यांच्या घरी पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडले आहे, असे म्हटले होते. तिच्या ट्विटच्या आधारे अनेकांनी बातम्या केल्या. सरनाईक म्हणालेत, ईडीच्या कोणत्याही अधिकाऱ्याने माझ्या घरी काय सापडले याची माहिती दिलेली नाही. कंगनाकडून याबाबत बदनामी करणे चूक आहे. ते म्हणालेत, हा ईडीच्या माध्यमातून माझी आणि कुटुंबीयांची देशभरात बदनामी करण्याचा प्रयत्न आहे.

अभिनेत्री कंगना राणावत हिने  माझ्याविरोधात खोटे  ट्विट केले. यामुळे कंगना तसेच त्याबद्दल बातम्या प्रसिद्ध करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक, प्रिंट आणि सोशल मीडिया यांच्याविरोधात मी हक्कभंग दाखल केला आहे. कंगनाच्या ट्विटच्या आधारे ज्या मीडियाने खोट्या बातम्या प्रसिद्ध केल्या त्यांच्याविरोधातील हक्कभंग प्रस्ताव मान्य करावा, अशी विनंती अध्यक्षांना केली आहे, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली. ते म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून ईडीचे अधिकारी चौकशी करत आहेत. चौकशीला आम्ही सर्वतोपरी सहकार्य करत आहोत.

चौकशीची गरज असेल, शंका असतील त्या निरसन करण्यासाठी दोन तासात हजर राहील, असे मी ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत आणि भविष्यातही देत राहीन. प्रताप सरनाईकांच्या घरी पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडले. राफेलचे कागदपत्र सापडले. ट्रम्प यांच्यासोबत भागीदारी असल्याची कागदपत्रे  सापडली. अशा खोट्या बातम्या प्रसिद्ध करून माझी आणि कुटुंबीयांची बदनामी करणाऱ्या कंगनाविरोधात मी हक्कभंग दाखल केला आहे. हे बदनामी करण्याचे कटकारस्थान आहे, असा आरोप प्रताप सरनाईक यांनी केला.

ही बातमी पण वाचा : पूर्वेश सरनाईक ईडीच्या चौकशीला गैरहजर, आजारी असल्याचे कारण पुढे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER