पाकिस्तानी गोलंदाजांचा ‘हा’ विक्रम कसोटी सामन्यात केवळ दुसऱ्यांदाच!

Maharashtra Today

झिम्बाब्वेविरुध्दचा (Zimbabwe) दुसरा कसोटी सामना पाकिस्तानने (Pakistan) एक डाव आणि 147 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. साहजिकच त्यांच्या गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केली आणि प्रभावी कामगिरी केल्याने त्यांनी काही विक्रमसुध्दा केले.

या सामन्यात पाकिस्तानच्या तीन गोलंदाजांनी डावात पाच किंवा अधिक बळी मिळवले. पहिल्या डावात हसन अलीने (Hasan Ali) 27 धावात 5 तर दुसऱ्या डावात नौमान अली (Nauman Ali) याने 86 धावात 5 आणि शाहीन शाह आफ्रिदीने (Shahin Shah Afridi) 52 धावात 5 गडी बाद केले. एकाच सामन्यात तीन गोलंदाजांनी पाच बळी मिळवले असा हा पाकिस्तानसाठी पहिलाच आणि एकूण सहावा कसोटी सामना ठरला.

याच्याआधी 1993 मध्ये इंग्लंडविरुध्दच्या एजबॕस्टन कसोटीत आॕस्ट्रेलियाच्या पाॕल रायफेल, शेन वाॕर्न आणि टीम मे यांनी डावात पाच बळी मिळवले होते.

हा विक्रम तरी सहाव्यांदा घडला पण नौमान अली व शाहिन आफ्रिदी यांनी तर कसोटी क्रिकेटच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदाच घडली अशी कामगिरी केली. हे दोघे डावखुरे गोलंदाज आहेत आणि कसोटी सामन्याच्या एकाच डावात दोन डावखूऱ्या गोलंदाजांनी प्रत्येकी पाच बळी मिळवले असे केवळ दुसऱ्यांदा घडले.

याच्याआधी तब्बल 112 वर्षांपूर्वी म्हणजे 1909 मध्ये इंग्लंडचे डावखुरे गोलंदाज जाॕर्ज हर्स्ट व काॕलीन ब्लायथ यांनी आॕस्ट्रेलियाविरुध्दच्या एजबॕस्टन कसोटीत अशी कामगिरी केली होती. त्यावेळी आॕस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात या दोघांनीही प्रत्येकी 58 धावात 5 बळी अशी सारखीच कामगिरी केली होती. योगायोगाने दोघांनीही गोलंदाजीसुध्दा सारखेच षटके म्हणजे हर्स्टने 23.5 व ब्लायथने 24 षटके केली होती. विशेष म्हणजे या सामन्याच्या पहिल्या डावातही आॕस्ट्रेलियाचे सर्वच गडी या दोघांनीच बाद केले होते. त्या डावात हर्स्टने 28 धावात 4 तर ब्लायथने 44 धावात 6 गडी बाद केले होते. याप्रकारे सामन्यात हर्स्टचे 9 व ब्लायथचे 11 बळी होते.

त्यानंतर आता तब्बल 112 वर्षांनी नौमान अली व शाहिन आफ्रिदी या डावखुऱ्यांनी हर्स्ट व ब्लायथ यांच्या कामगिरीची बरोबरी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button