पाकिस्तान हादरलं! पेशावरच्या मदरशात मोठा स्फोट; ७ बालकांचा मृत्यू

Peshawar Pakistan

पेशावर : पाकिस्तानच्या (Pakistan) पेशावरमधील (Peshawar) एका मदरशात मोठा स्फोट झाला आहे. दीर कॉलनीमधील मदरशात हा बॉम्बस्फोट झाला आहे. दिर कॉलनीतील मदरशात झालेल्या स्फोटात ७ बालकांचा मृत्यू झाला असून ७० हून अधिक जण जखमी झाल्याचं वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिलं आहे. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू झालं आहे. जखमी बालकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याचं काम सुरू आहे. यातील अनेक बालकांची प्रकृती गंभीर आहे.

पाकिस्तानच्या डॉन न्यूजनं पोलिसांच्या हवाल्यानं दुर्घटनेत ७ बालकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त दिलं आहे. या स्फोटामागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. सिलेंडरच्या स्फोटामुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती काही स्थानिकांनी दिली. सध्या पोलीस घटनास्थळी पोहोचले असून त्यांच्याकडून तपास सुरू आहे.

खैबर पख्तुनख्वाचे पोलीस प्रमुख डॉ. सनाउल्लाह अब्बासी आणि एसएसपी मंसूर अमन यांनी स्फोटाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. जखमींना जवळच्या लेडी रिंडिंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालयाचे प्रवक्ते मोहम्मद आसीम यांनी सात मृतदेह आणि ७० जखमींना रुग्णालयात आणण्यात आलं असल्याची माहिती दिली आहे. जखमींवर तात्काळ उपचार दिली जात असून रुग्णालयाचे संचालक स्वत: आपातकालीन विभागात हजर असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. याशिवाय रुग्णालयात वैद्यकीय सुविधेसाठी एमर्जन्सी जाहीर करण्यात आली असल्याचं ते म्हणाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER