पाकिस्तानचा संघ भारतात क्रिकेट सामने खेळणार!

Jay shah - Maharastra Today
Jay shah - Maharastra Today

भारत (India) आणि पाकिस्तानदरम्यानचे (Pakistan) क्रिकेट बऱ्याच वर्षांपासून बंद असले तरी यंदा पाकिस्तान संघ भारतात सामने खेळण्याची शक्यता आहे. यंदा होणाऱ्या टी-20 विश्वचषक (T20 world cup cricket) स्पर्धैसाठी भारत सरकारने पाकिस्तानी क्रिकेटपटूंना व्हिसा देण्याची तयारी दर्शवली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी याची माहिती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला दिली आहे. यामुळे आजच्या घडीला वन डे क्रिकेटचा नंबर वन खेळाडू असलेला बाबर आझम भारतात खेळताना दिसणार आहे आणि कदाचित विराट कोहलीसोबत त्याचे श्रेष्ठत्वाचे द्वंद्वसुध्दा बघायला मिळू शकते.

पाकिस्तानी संघाचा व्हिसाचा प्रश्न मिटला असला तरी त्यांचे समर्थक भारतात येऊन सामने बघू शकतील की नाही हे स्पष्ट झालेले नाही. त्याचा निर्णय नंतर होणार आहे.

याच्याआधी पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष एहसान मनी यांनी भारताकडून पाकिस्तानी क्रिकेटपटूंना व्हिसाची लेखी हमी मिळाली तरच पाकिस्तानी संघ विश्वचषक स्पर्धेत सहभागी होईल अन्यथा स्पर्धा दुसरीकडे आयोजित करावी अशी भूमिका घेतली होती.

या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या सामन्यांसाठी बीसीसीआयने नऊ ठिकाणे निश्चित केले असल्याचे समजते. धर्मशाला, बंगळुरू, कोलकाता, मुंबई, चेन्नई, लखनऊ, अहमदाबाद, दिल्ली आणि हैदराबाद येथे हे सामने होणार असून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना होईल, असे वृत्त आहे. भारत आणि पाकिस्तान संघादरम्यान 2012-13 पासून क्रिकेट मालिका खेळली गेलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button