कोरोनाला रोखण्यात पाकिस्तान यशस्वी; WHO कडून तोंडभरून कौतुक

इस्लामाबाद : पाकिस्तानने कोरोनाला रोखण्यात यश मिळवल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही यासाठी पाकिस्तानचे तोंडभरून कौतुक केले आहे. सध्या संपूर्ण जगानं पाकिस्तानकडून शिकण्याची गरज असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) संचालक टेड्रोस अधनोम म्हणाले.

पाकिस्ताननं कोरोनाशी लढण्यासाठी अनेक वर्षे जुन्या असलेल्या पोलिओ पॅटर्नचा वापर केला असल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानमध्ये आरोग्य कर्मचा-यांनी घरोघरी जाऊन लहान मुलांना पोलिओची लस दिली. त्यांचे टेड्रोस यांनी कौतुक केले. हे करताना पाकिस्ताननं याच आरोग्य साखळीचा वापर कोरोनाशी संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी केला. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या लवकर नियंत्रणात आली.

पाकिस्तानात सध्याच्या घडीला कोरोना रुग्णांची संख्या तीन लाख इतकी आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस यांनी केलेल्या कौतुकावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे माजी विशेष सहायक डॉ. जफर मिर्झा म्हणाले, पाकिस्ताननं कोरोनाला रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचं आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक झाल्याचा आनंद! अशी प्रतिक्रिया दिली. पाकिस्तानात आतापर्यंत ३ लाख ९५५ जणांना कोरोनाची लागण झाली.

यापैकी ६ हजार ३७३ जणांचा मृत्यू झाला. २ लाख ८८ हजार ५३६ जणांनी कोरोनावर मात केली. तर सध्याच्या घडीला ६ हजार ४६ जणांवर उपचार सुरू आहे. पाकिस्तानप्रमाणे, जगातील अनेक देशांना कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात लवकर यश मिळालं. यापैकी बहुतांश देशांनी याआधी SARS, MERS, पोलिओ, इबोला, फ्लू यांच्यासारख्या साथीच्या आजारांचा सामना केला होता. कोरोनावर नियंत्रण मिळविले म्हणून या देशांचेही टेड्रॉस यांनी कौतुक केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER