पाकिस्तानला हिसका, ‘ग्रे’ यादीत कायमच!

Imran Khan

पॅरिस :- वित्तीय कारवाई कृती दलाच्या (एफएटीएफ) ‘ग्रे’ यादीमधून बाहेर पडण्यासाठी सुरू असलेले पाकिस्तानचे प्रयत्न फोल ठरले आहेत. पाकिस्तानला ‘ग्रे’ यादीमध्ये कायम ठेवण्याचा निर्णय एफएटीएफने आज मंगळवारी घेतल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

शीना बोरा हत्याकांड; गरज भासल्यास फेरचौकशी : अनिल देशमुख

मागील आठवड्यापासून या यादीतून बाहेर पडण्याचे प्रयत्न पाकिस्तान करीत होता. दहशतवादी संघटनांना अर्थपुरवठा केल्याचा आरोप ज्या देशांवर आहे, अशा देशाच्या नावांच्या यादीला ‘ग्रे’ यादी म्हटले जाते. वित्तीय कारवाई कृती दलाच्या कारवाईपासून वाचण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काही पुरावे ‘एफएटीएफ’ला दिले होते. परंतु, या पुराव्यांनी एफएटीएफचे समाधान झाले नसल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे. दरम्यान, पाकिस्तानचा समावेश भविष्यात ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये होण्याचीही शक्यता आहे.