पाकिस्तानच्या विमान अपघातात ‘या’ प्रसिद्ध मॉडेलचा झाला मृत्यू

Zain Khan

मुंबई : पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे (पीआयए) ९९ प्रवासी आणि आठ कर्मचारी असलेले विमान शुक्रवारी कराचीतील जिना आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील दाट लोकवस्ती असलेल्या निवासी परिसरात कोसळून ६० जण ठार झाले आहेत.

 या विमान अपघातात पाकिस्तानची प्रसिद्ध मॉडेल झारा आबिद हिने जीव गमावल्याची माहिती समोर येत आहे. माहितीनुसार, लाहोरहून कराचीकडे जाणाऱ्या विमानाचा  लँडिंगच्या आधी अपघात झाला. झारा आबिदच्या काकांचे निधन झाल्यानं ती लाहोरमधून निघाली होती.

पाकिस्तानी मॉडेल झारा अबिद अपघातग्रस्त विमानामध्ये होती. तिच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. फॅशन डिझायनर  खादिजाह शाहने म्हटले की, फॅशन जगताने विमान अपघातात झारा आबिदला गमावलं.

ती कष्टाळू आणि व्यावसायिक होती. तिच्या आत्म्याला शांती लाभो, असे शाहने म्हटले आहे . झारा आबिदने शेवटच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये हेलिकॉप्टरमध्ये बसलेला फोटो पोस्ट केला आहे. त्याला कॅप्शन देताना म्हटले होते की, “Fly high, it’s good’. तिची ही शेवटची पोस्ट ठरली.

 

 

View this post on Instagram

 

~ Fly high, it’s good #ZaraAbid

A post shared by Zara Abid (@zaraabidofficial) on


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER