पाकिस्तानात फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम, टिकटॉक सगळ्यांवर बंदी; कारण चकित करणारे?

Imran Khan - Bans Social Media

इस्लामाबाद : पाकिस्तानने (Pakistan) संपूर्ण देशात सर्व सोशल मीडिया अ‌ॅप्सवर तात्पुरत्या स्वरुपात बंदी घातली आहे. आजपासून फेसबुक (Facebook) , इन्स्टाग्राम (Instagram), टिकटॉक (Tik Tok), टेलिग्राम (Telegram) आदी सगळं काही बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. पाकिस्तानी गृहमंत्रालयाने याबाबत आदेश काढले आहेत. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तान टेलिकम्युनिकेशन अथॉरिटीने सर्व समाजमाध्यमं बंद केली आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेस धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे पाकिस्तानने हा निर्णय घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान या धार्मिक संघटनेच्या लोकांमध्ये फ्रान्सबदद्ल रोष आहे. याच रोषापोटी पाकिस्तानमध्ये ठिकठिकाणी आंदोलन होत आहेत. फ्रान्समध्ये मोहम्मद पैगंबर यांचे कार्टून प्रकाशित केल्यामुळे हे आंदोलन सुरु आहे. तसेच या आंदोलनाचा एक भाग म्हणून फ्रान्सच्या राजदुतांनीसुद्धा पाकिस्तान सोडून जावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून होत आहे. हे आंदोलन संपूर्ण पाकिस्तानमध्ये पसरले आहे. त्यामुळे सामाजिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी पाकिस्तानमध्ये सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज (16 एप्रिल) दुपारी 3 वाजेपर्यंत ही बंदी घालण्याचे आदेश होते. मात्र, अद्याप पाकिस्तानमधील सोशल मीडिया सुरळीत केले किंवा नाही, याबद्दल समजू शकले नाही.

पाकिस्तानी लोकांमध्ये फ्रान्सबद्दल रोष आहे. वेगवेगळ्या धार्मिक संघटना फ्रान्सविरुद्ध आंदोनल करत आहेत. यामध्ये तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान या संघटनेचा मुख्य सहभाग आहे. या संघटनेवर पाकिस्तामध्ये बंदी घालण्यात आलेली आहे. मुळात फ्रान्समध्ये मोहम्मद पैगंबर यांचे कार्टून बनवल्यामुळे पाकिस्तानमध्ये फ्रान्सविरोधात एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरु आहे. दरम्यान, मिळालेल्या ताज्या माहितीनुसार या आंदोलनात आतापर्यंत अनेक नागरिकांचा मृत्यू झाला असून नागरिकांचा फ्रान्सविरोधातील रोष कायम असून अजूनही येथे आंदोलन सुरुच आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button