पाकिस्तान : सिंधमध्ये मंदिरावर हल्ला; मूर्तीची विटंबना

सिंध मंदिर

इस्लामाबाद : सिंध प्रांतांमधील माता रानी भातियानी मंदिरावर अज्ञात लोकानी हल्ला केला. मंदिरात तोडफोड केली. मूर्तीची विटंबना केली. सामान आणि पोथ्या-पवित्र ग्रंथ फाडले.

पाकिस्तानचे वरिष्ठ पत्रकार नायला इनायत यांनी या घटनेचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यांनी लिहिले आहे की – पाकिस्तानमध्ये आणखी एका मंदिराची तोडफोड करण्यात आली. यामध्ये अज्ञात व्यक्तींनी मंदिर आणि पवित्र ग्रंथांचे नुकसान केले आहे.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की पाकिस्तानमध्ये बरेचवेळा अशा घटना घडत असतात. काही दिवसांपूर्वी एका स्थानिक युवतीचे अपहरण करत जबरदस्तीने तिचे धर्मपरिवर्तन करण्यात आले. पाकिस्तानातल्या नानकाना गुरूद्वारावर मुस्लिमांच्या जमावाने हल्ला चढवत दगडफेक केली होती. याविरोधात अनेक वेळा स्थानिक अल्पसंख्याकांनी आंदोलने केली. मात्र, पाकिस्तान सरकारवर आरोपींवर कारवाई करत नाही.