पाकिस्तान आणि तुर्की इस्रायलविरोधात आक्रमक; मुस्लीम देशांचा इस्रायलवर राग

Pakistan and Turkey are aggressive against Israel

नवी दिल्ली :- सध्या इस्रायल आणि पॅलेस्टाईन (Israel and Palestine) यांच्यात सुरू असलेल्या हिंसाचारात मुस्लीम देशांचा इस्रायलवर प्रचंड राग आहे. यात एक देश वारंवार पुढे येऊन इस्रायलावर टीका करत आहे आणि त्याचे नाव तुर्की आहे. या पार्श्वभूमीवर इस्लामी देशांनी एकत्र येऊन पॅलेस्टाईनविरुद्ध लढण्याची तयारी सुरू केली होती. त्यासाठी इस्लामी देशांची संघटना असलेल्या IOC ची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत इस्रायलवर जोरदार टीका करण्यात आली. मात्र, इतर देशांना धडा देणाऱ्या तुर्कीलाच अगोदर कृतीतून काहीतरी ठोस करून दाखवण्याची आवश्यकता आहे.

या बैठकीत पाकिस्तान आणि तुर्की इस्रायलविरोधात प्रचंड आक्रमक होताना दिसले. मलेशिया, इंडोनेशिया आणि ब्रुनेई यांनीही संयुक्त राष्ट्रसंघाला इस्रायल-पॅलेस्टाईन वादात हस्तक्षेप करण्याविषयी सुचविले. या भागात कोणताही संघर्ष होणार नाही, शांती कायम राहील, यासंदर्भात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्त्वाखाली करार झाला होता. या कराराचे पालन केले जावे, अशी मागणी ‘यूएई’कडून करण्यात आली.

गेल्या वर्षी डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रयत्नांनंतर यूएई आणि बहरेन यांनी इस्रायलसोबत राजनैतिक संबंध कायम ठेवले. सौदीलाही हे आवाहन केले होते. मात्र, सौदीने पॅलेस्टाईनला १९६७ ची सीमा दिली जात नाही, तोपर्यंत इस्रायलसोबत औपचारिक नाते जोडले जाणार नाही, असे सौदीने जाहीर केले. तुर्कीने यूएई आणि बहरेनची निंदा केली. पण स्वतः तुर्कीचेच इस्रायलसोबत चांगले संबंध आहेत. तुर्की हा इस्रायलला मान्यता देणारा पहिला मुस्लीमबहुल देश होता.

पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देण्यात यावी आणि त्याची राजधानी जेरूसलेम असावी, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. संयुक्त अरब अमिरातीने यापूर्वीच इस्रायलकडून पॅलेस्टाईनवर करण्यात येणाऱ्या हल्ल्यांचा निषेध केला होता. जागतिक समुदायाने हा संघर्ष थांबवावा, अशी मागणी ‘युएई’चे परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैजल बिन फरहन अल सउद यांनी केली होती.

जाणकारांच्या मते, पॅलेस्टाईन आणि इस्रायल हा अरबी देशांचा वाद होता. पण १९६७ च्या युद्धात इस्रायलने विजय मिळवल्यानंतर हा वाद आता फक्त पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांच्या पुरताच मर्यादित आहे. मुस्लीम राष्ट्र पॅलेस्टाईनच्या जाहीरपणे समर्थनात उतरतात, पण निंदा करण्याच्या पलिकडे काहीही करत नाहीत. मुस्लीम देशांमध्येच आपापसातील वाद आणि राजकीय इच्छा शक्तीचा अभाव आहे. त्यामुळे तुर्कीचा स्वतःला लीडर ऑफ मुस्लीम वर्ल्ड म्हणवून घेण्याचे स्वप्न अधुरे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button