‘ओआयसी’त पाकिस्तान एकाकी; सौदी आणि यूएईचे भारताला समर्थन

Imran Khan-PM Modi

नवी दिल्ली :- इस्लामिक देशांची संघटना ओआयसीमध्ये  (ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशन)  भारतावर ‘इस्लामोफोबिया’ पसरवण्याचा आरोप केल्यानंतर बहुसंख्य इस्लामिक देशांनी भारतावरचा आरोप खोडून भारताचे समर्थन केल्याने पाकिस्तान एकाकी पडला.

भारताची बाजू घेणाऱ्या देशात मालदीवव्यतिरिक्त सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातचा समावेश आहे.

भारत इस्लामोफोबियाला खतपाणी घालतो, असा आरोप संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानचे राजदूत मुनीर अकरम यांनी आयओसीच्या ‘ऑनलाईन’ बैठकीत केला होता. मालदीवने याचे खंडन केले. भारत हा जगातील सर्वांत मोठा लोकशाही असलेला देश आहे. भारतात २० कोटींपेक्षा जास्त मुसलमान राहतात, भारतावर असा आरोप करणे  अयोग्य आहे. अशा प्रकारचा आरोप दक्षिण आशियाई क्षेत्रात करणे हे धार्मिक एकतेसाठी घातक आहे, असे म्हटले.

भारताने सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, अफगाणिस्तान यासारख्या  इस्लामिक देशांशी संबंध दृढ केले आहेत. या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या देशातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले आहे.

पाकिस्तानने दक्षिण आशियातील सर्व देशांसोबत मिळून काम करणे आवश्यक आहे आणि त्यानी त्यांच्या भूमिकेत बदलही केला पाहिजे, असे मालदीवने म्हटले आहे.

भारताचा मित्र ओमाननेही हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचे मत व्यक्त केले. अन्य मुस्लिम देशांनी प्रतिक्रियाच दिल्या नाहीत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER