बाप्पांच्या मूर्तींचे रंगकाम पूर्ण; पण बुकिंगच नाही म्हणून चिंता

Ganeshotsav

मुंबई :- कोकणात (Konkan) व एकूणच महाराष्ट्रातच (Maharashtra) घरोघरी दीड, पाच, सात, दहा दिवसांचे गणपती असतात. कोरोनामुळे गर्दी टाळायची असल्याने यंदा गणेशाची प्रतिष्ठापना करायची की नाही, या द्विधा अवस्थेत नागरिक आहेत. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात (Ganeshotsav) गणेशाची मूर्ती बनवून पोट भरणाऱ्या  व्यावसायिकांवर मोठे आर्थिक संकट उभे झाले आहे.

मूर्तिकला केंद्रात कारागीर मूर्तींवरून रंगाचा शेवटचा हात फिरवण्यात व्यस्त आहेत. मात्र, यंदा गणेशमूर्तीला मागणी नसल्याची खंत कारागिरांकडून व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाचे (Corona Virus) विघ्न दूर होऊन बाप्पाचे आगमन निर्विघ्न होऊ दे, असे गणेशभक्त साकडे घालत आहेत. येत्या २२ ऑगस्टपासून गणेशोत्सव सुरू होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER