
मुलांच्या जन्मानंतर त्यांचे लग्न म्हणजे आई-वडिलांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बाब असते. त्यामुळे मुलांच्या लग्नात काय करू आणि काय नको असे त्यांना वाटत असते. असे आई-बाप मग अगदी झोपडपट्टीत राहाणारे असोत वा अँटिलियामध्ये राहाणारे अंबानी असोत. मुलांच्या लग्नात ताल धरून आनंद व्यक्त करताना सर्रास दिसतात. एकेकाळची लोकप्रिय अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरेही आता सासू झाली असून तिने मुलाच्या लग्नात मनसोक्त डांस केल्याचे व्हीडियो सोशल मीडियावर शेअर झालेले दिसत आहेत. या व्हीडियोत पद्मिनी कोल्हापुरे (Padmini Kolhapure ) डांस करताना दिसत आहे.
पद्मिनीचा मुलगा अभिनेता प्रियांक शर्माने (Priyank Sharma) गुरुवारी प्रख्यात निर्माता करीन मोरानी याच्या मुलीबरोबर शजा मोरानीबरोबर लग्न केले. गुरुवारीच या दोघांनी कोर्ट मॅरेज केले आणि शुक्रवारी हिंदू पद्धतीने सात फेरे घेतले. प्रियांकने गेल्या वर्षी सब कुश मंगल सिनेमातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. या सिनेमात त्याच्यासोबत भोजपुरी अभिनेता रवी किशनची मुलगी रीवा किशन होती. शजा मोरानी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये ‘ऑल्वेज कभी कभी’ आणि ‘हॅप्पी न्यू इयर’ सिनेमासाठी काम केलेले आहे. हे दोघे खूप काळापासून एकमेकांना डेटिंग करीत होते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दोघांचा साखरपुडा झाला होता.
बुधवारी या दोघांची संगीत सेरेमनी झाली होती. या संगीत सेरेमनीत पद्मिनी कोल्हापुरे मनसोक्त नाचली होती. मुलाच्या लग्नाचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. मुलगा प्रियांकनेही ढोल डांसमध्ये आईला साथ दिली होती. या दोघांचा हा डांस खूपच व्हायरल झाला आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला