पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रभुणे यांना महापालिकेची नोटीस ; आशिष शेलार संतापले

Girish Prabhune - Ashish Shelar

पुणे :- सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे (Girish Prabhune) यांना नुकतेच पद्मश्री पुरस्काराने (Padma Shri Award) सन्मानित करण्यात आले. त्यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेने (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) मालमत्ता कराची नोटीस पाठवली आहे. प्रभुणे यांची पिंपरीमध्ये पुनरुत्थान समरसता गुरुकुलम नावाने संस्था आहे. या संस्थेला महापालिकेची मालमत्ता कर भरण्यासंबंधी नोटीस आली आहे. भाजपा (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) या प्रकरणावरून पुणे महापालिकेवर चांगलेच संतापले आहेत.

महापालिकेच्या आयुक्ताचं डोकं ठिकाणावर आहे का? या प्रशासकीय बाबींमध्ये ज्या पद्धतीने बिलं काढली जातात आणि पाठवली जातात हे काही सत्तेत बसलेल्या महापौरांच्या निदर्शनास आणून काढली जात नाही. पण आयुक्तांनी प्रशासकीय काम करताना डोकं ठिकाणावर ठेवून काम केलं पाहिजे. आमची मागणी आहे की, पिंपरी-चिंचवडच्या आयुक्तांवर कारवाई करा आणि महापौरांना माझं निवेदन असेल की, प्रभुणे यांना पाठवलेल्या बिलावर स्थगिती द्या, अशी मागणी भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे. १ कोटी ८३ लाख मालमत्ता कर भरण्याची ही नोटीस आहे. २१ जानेवारीला महापालिकेडून ही नोटीस पाठवण्यात आली होती आणि त्यानंतर २५ जानेवारीला प्रभुणे यांना पद्मश्री जाहीर झाला होता. एक लाखाहून अधिक थकबाकी असणाऱ्या सगळ्यांनाच ही नोटीस पाठवण्यात आली होती, अशी भूमिका महापालिकेने घेतली होती.

कोण आहेत गिरीश प्रभुणे ?
प्रभुणे गेल्या अनेक वर्षांपासून पारधी समाजाच्या हक्कासाठी आणि त्यांच्या उत्थानासाठी कार्य करत आहेत. पारधी समाजातील मुलांना शिक्षण मिळावं, त्यातही पारधी समाजातील मुलींना शिक्षण मिळावं, पारधी समाजाचं पुनर्वसन व्हावं यासाठी प्रभुणे कार्य करत आहेत. त्यासाठी त्यांनी पुनरुत्थान समरसता गुरुकुलम या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली आहे. वसतिगृहाचीही येथे व्यवस्था आहे. या गुरुकुलममध्ये पारधी समाजातील २०० मुले आणि १५० मुली शिकत आहेत. प्रभुणे यांनी १९७० पासून पारधी समाजासाठी काम करण्यास सुरुवात केली आहे. गिरीश प्रभुणे यांना नुकताच सामाजिक कार्यासाठी पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे.

ही बातमी पण वाचा : मंत्री पब-पार्टीत गुंग, कार्यकर्ते ‘गोली मार भेजे में’ स्टाईलमध्ये ;  आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंना टोला 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER