‘लाडक्या मंत्र्याने टक्करवारीसाठी लोकहिताचा निर्णय मागे घेऊ नये’, पडळकरांची आदित्य ठाकरेंवर टीका

Maharashtra Today

मुंबई : राज्यात सरसकट लोकांना कोरोना लस मोफत द्यायची याबबात राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab malik) यांनी घोषणा केली होती. त्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनीही ट्विट करत तशी घोषणा केली. मात्र काही वेळातच आदित्य ठाकरेंनी केलेले ट्विट डिलीट करत घुमजाव केले. आणि यावरुन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी आदित्य ठाकरेंवर शेलक्या शब्दात टीका केली आहे. ‘लाडक्या मंत्र्याने टक्करवारीमुळे लोकहिताचा निर्णय मागे घेऊ नये’, अशी खोचक टीका पडळकर यांनी केली आहे.

बिघाडी सरकारचे लाडके मंत्री आदित्य ठाकरे यांचे मोफत लसीकरणाबाबतचे ट्विट वाचून आनंद झाला. पण तो काही क्षणातच विरला. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा वारसा सांगणारे तुम्ही आहात, ‘ वाटाघाटी ʼ आणि ‘टक्केवारीमुळे ʼ लोकहितासाठी जाहिर केलेला संपूर्ण महाराष्ट्रासाठी ‘मोफत लसीकरणाचा’ ‘निर्णय वापस घेऊ नये, हीच अपेक्षा, असे म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंना लक्ष्य केले.

तसेच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझेला दिलं असल्याचा आरोप सिंह यांनी केला होता.याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आला असून देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले आहे. यामुळे अनिल देशमुख यांना अटक होणार असल्याच्या चर्चाँणा उधाण आलं आहे. यावरून पडळकर यांनी देशमुखांवर निशाणा साधतावा वाझेचा धनी देशमुख मग देशमुखांचा कोण?, असा सवाल केला आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार सीबीयाने माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर एफआयआर दाखल केले. हे तर जगजाहिर झाले आहे की, सचिन वाझेचा धनी अनिल देशमुख. आता फक्त एकच प्रश्न देशमुखांचा धनी कोण?, अशी पोस्ट पडळकर यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button