शरद पवारांनी ‘येडं पेरलं अन् खुळं उगवलं’; पडळकरांचा हसन मुश्रिफवरही टार्गेट

Gopichand Padalkar and Hassan Mushrif sharad pawar

मुंबई :- महाराष्ट्र राज्य लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावे, यासाठी राज्य सरकारने ‘कोरोनामुक्त गाव’ ही स्पर्धा आयोजित केली आहे. ‘कोरोनामुक्त गाव’ (Corona mukta village) केलेल्या जिल्ह्याला सरकारकडून बक्षिसेदेखील देण्यात येणार आहे. या स्पर्धेवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी हल्लाबोल केला आहे. ‘सगळे गावच करेल तर सरकार काय करेल. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मोडला असताना, त्यांचे अश्रू पुसण्याऐवजी दु:खाची थट्टा करणारी स्पर्धा कशी सुचते? असा सवाल करताच पडळकरांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनाही टार्गेट केले.

पडळकर म्हणाले की, “आघाडी सरकारच्या नावाखाली शरद पवारांनी (Sharad Pawar) ‘येडं पेरलं अन् खुळं उगवलं’ अशी गत ठाकरे सरकारची झाली आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा कोरोना आणि लॅाकडाऊनमुळे पूर्णपणे मोडला आहे. त्यांचे अश्रू पुसण्याऐवजी तुम्हाला जनतेच्या दु:खाची थट्टा करणारी स्पर्धा सुचते आहे. जर सगळे गावच करतील तर सरकार काय करेल. नेहमीप्रमाणे आपली जबाबदारी दुसऱ्यावर झटकून देण्याच्या उद्देशाने ही कोरोनामुक्तीची स्पर्धा आणली आहे.”

या योजनेच्या व्यवस्थापनेचे सर्व २२ निकषांमध्ये या वसुली सरकारला शून्य गुण आहेत. या पथकांना किंवा व्यवस्थापनेसाठी ‘निधी’ कोण देणार? ही बाब सोयीस्करपणे अंधारात ठेवली आहे, असे म्हणत पडळकरांनी मुश्रीफांवर निशाणा साधला. या ५० लाखांच्या बक्षीसांबद्दलही मला शंका आहे. कारण ज्या पत्रकारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, त्यांना जीआर काढून ५० लाखांची मदत करतो सांगणाऱ्यांनी एक रुपयाचाही मदत केली नाही, त्या कुटुंबियांनादेखील साधी भेटही दिली नाही. ही स्पर्धा म्हणजे अशाच यांच्या ‘भूलथापांच्या मालिकेचा’ एक भाग आहे, असा हल्लाबोल पडळकरांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTERMT google button